Tuesday, September 25, 2018


 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी
15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नांदेड, दि. 25 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज 15 ऑक्टोंबर पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड येथे कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी  शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये खालील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. खर्चाची बाब नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरातील महाविद्यालये / क्षणिक संस्था याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढील प्रमाणे आहे. भोजन भत्ता- 28 हजार. निवास भत्ता-15 हजार. निर्वाह भत्ता- 8 हजार रुपये याप्रमाणे प्रति विद्यार्थी एकुण 51 हजार रुपये देय रक्कम राहील. या रकमेव्यतिरीक्त वैद्यकीय अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष - विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. विद्यार्थी कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा.
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांस इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदवीकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेलली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर करावा.
विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के जास्त असणे बंधनकारक असेल. अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रे व संकेतस्थळ- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना खालील संकेतस्थळात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. गरजु विद्यार्थ्यानी तो संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावा. संकेतस्थळ http:sjsa.maharashtra.gov.in & http://maharashtra.gov.in योजनेच्या अटी व शर्ती तसेच अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या अर्जासोबत जोडली आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे कार्यालयीन 02462-220277 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क  साधावा, असेही आवाहन केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...