Thursday, August 16, 2018


भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी
यांच्या निधनाबद्दल देशभर सात दिवसांचा दुखवटा
नांदेड, दि. 16 :- भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यामुळे दि. 16 ते 22 ऑगस्ट, 2018 या संपूर्ण कालावधीत देशभर शासकीय दुखवटा राहील. या कालावधीत कोणतेही कार्यालयीन मनोरंजनाचे (Official Entertainment) कार्यक्रम होणार नाहीत. या कालावधीत संपूर्ण भारतात ज्या ठिकाणी दररोज राष्ट्रध्वज फडकविला जातो, त्या ठिकाणी वरील कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील.
त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या राष्ट्रध्वज फडकाविणाऱ्या पथकाला व कार्यालयाला तात्काळ सूचना द्याव्यात, असे शासनाने कळविले आहे. दिनांक 16 ते 22 ऑगस्ट 2018 पर्यंत अशा ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील याची दक्षता घ्यावी. त्यानंतर 23 ऑगस्ट 2018 पासून पुर्ववत राष्ट्रध्वज चढवावा तसेच 16 ते 22 ऑगस्ट 2018 या कालावधीत कोणतेही मनोरंजनाचे शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...