Saturday, February 3, 2018

आजपासून कर्करोग जागृती पंधरवडा
कर्करोग रुग्णांचा मोफत उपचार
नांदेड दि. 3 :- जागतिक कर्करोग दिनानिमित्त उद्या दि. 4 फेब्रुवारी पासून कर्करोग जागृती पंधरवडासाजरा करण्यात येणार आहे. याकाळात कर्करोग तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत तपासणी अंती निश्चित निदान झालेल्या रुग्णाचे हैद्राबाद येथील कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सतीश पवार, डॉ. एन. एस. गुलाटी व डॉ. मोरे हे 16 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे सर्व प्रकारच्या कर्करोग रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रुग्णांनी या तपासणी व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे. 
जिल्ह्यात जागतिक कर्करोग दिन व पंधरवाडा  4 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त श्री गुरु गोबिंद सिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कर्करोग दिन व पंधरवाडा दिनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोनार्क कॅन्सर हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. एन. एस गुलाटी यांनी कार्कारोगाबद्दल मार्गदर्शन केले.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर तोंडातील लालसर चट्टा, तोंड उघडता न येणे, अन्न नलीकेचा त्रास होणे, स्त्री स्तनास गाट असणे, गर्भाशयाचा कर्करोग या विविध प्रकारच्या कर्करोगांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती दिली.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी, ईएनटी सर्जन डॉ. रहेमान डॉ. लोकडे डॉ. व्ही. एस. पवार, डॉ. सबा खान, डॉ. सुजाता राठोड, डॉ. प्रदीप बोरसे उपस्थित होते. कार्यक्रमास रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी केले तर  सुवर्णकार सदाशिव यांनी आभार मानले.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...