Saturday, February 3, 2018

एसएसबी मुलाखतीच्या
तयारीसाठी प्रशिक्षण उपलब्ध
नांदेड दि. 3 :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायूदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण आयोजित केल्याचे, नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळवले आहे. 
प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हीसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल इंट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एसएसबी परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे. अशा उमेदवारांना सर्विसेस सिलेक्शन बोर्ड एसएसबी मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर नाशिक रोड नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे.
सन 2018 मधील दहा दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. फेब्रुवारी तिसरा आठवडा, मार्च दुसरा, जुन पहिला, जुलै चौथा, ऑग्स्ट तिसरा व नोव्हेंबर तिसरा आठवडा याप्रमाणे एसएसबी मुलाखतीच्या तयारीसाठी क्लासेस आयोजित करण्यात आले आहे.
इच्छूक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, तहसिल कार्यालयाजवळ नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.                        

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...