Saturday, February 17, 2018


दहावी, बारावी परीक्षार्थींनी केंद्रात
अर्धातास लवकर उपस्थित रहावे
  नांदेड, दि. 17 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी परीक्षा इयत्ता बारावीसाठी 76 केंद्र व दहावीसाठी 152 केंद्रात घेण्यात येणार आहेत. परीक्षार्थींनी परीक्षा दालनात परीक्षेपूर्वी अर्धा तास आधी उपस्थित रहावे. परीक्षा सुरु झाल्यानंतर कोणत्याही कारणावरुन उशिराने येणाऱ्या परीक्षार्थीस दालनात प्रवेश दिला जाणार नाही, याबाबत संबंधीत पालक व विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन दक्षता समितीने केले आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2018 ही अनुक्रमे 21 फेब्रुवारी ते 20 मार्च आणि 1 ते 24 मार्च 2018 या कालावधीत जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रात घेण्यात येणार आहेत. परीक्षा कॉपी मुक्त, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, अशी माहिती शिक्षणाधिकारी (मा.) जि. प. नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.   
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...