Saturday, February 17, 2018


माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस
गर्भलिंग निदान चाचणी तसेच अवैध पद्धतीने गर्भपात
करणाऱ्यांची माहिती द्यावी - अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील    

  नांदेड, दि. 17 :- सोनोग्राफी केंद्रात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान अथवा अनोंदणीकृत गर्भपात केंद्रात अवैध पद्धतीने गर्भपात होत असल्यास त्याची माहिती तक्रार टोल फ्री क्र. 18004334475 किंवा www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर नोंदवावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
गर्भधारणापूर्व व प्रसव पूर्व गर्भलिंग निदान निवडीस प्रतिबंध कायदा 2003 ची परिणामकारक अमलबजावणी होण्याच्या दृष्टीकोनातून शासनाने जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता पथकाची स्थापना केली आहे. त्यानुसार दक्षता पथकाची बैठक अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे अध्यक्षतेखाली 16 फेब्रुवारी रोजी  घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी सोनोग्राफी केंद्रात अवैध पद्धतीने गर्भपात होत असल्या किंवा अपात्र व्यक्ती गर्भपात करीत असल्यास अशी माहिती देणाऱ्यास शासनातर्फे एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी .पी कदम यांनी दिली.
या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रात तपासणी करण्यात आलेल्या गरोदर मातांच्या सोनोग्राफीचा आढावा घेण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाणाची माहिती देण्यात आली.  जास्तीतजास्त नागरिकांनी गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्राची व अवैध पद्धतीने गर्भपात करणाऱ्या केंद्रांची तक्रार टोल फ्री. क्रमांकावर नोंदवावी, असेही आवाहन केले आहे.
बैठकीस मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुमती ठाकरे, पी. जी. देशपांडे, पोलीस निरीक्षक,डॉ. एस. व्ही. फुलवरे, सामाजिक कार्यकर्ती डॉ. शोभा वाघमारे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अन्सारी, विधी समुपदेशक-पएनडीटी कक्षाचे अॅड. पजा राठोर यांची उपस्थिती होती.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...