Friday, February 2, 2018

ध्येय निश्चिती यशासाठी फलदायी
- सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन
नांदेड दि. 2 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपले ध्येय निश्चित करुन त्यानुसार सात्यतपूर्वक अभ्यास, जिद्य चिकाटी ठेवल्यास याबाबी  यशासाठी फलदायी ठरतात. यासाठी वाचन, लेखन बोलण्याची क्षमता विकसित करणे हेही तितकेच महत्वाचे असल्याचे, प्रतिपादन धर्माबादचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड वाघाळा शहर मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने उज्ज्वल नांदेड मोहिमेअतंर्गत आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या शिबिरास उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रा.सुजीत पवार (पुणे) जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची यावेळी उपस्थिती होती.
नुरुल हसन पुढे म्हणाले की, घरच्या वा सभोतालच्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करता यावर मात करुन हवे ते प्रतिष्ठेचे पद मिळविल्या जाऊ शकते. फक्त गरज आहे ती कठोर परिश्रमाची. असे परिश्रम करण्याची ज्याची तयारी आहे त्यांना कुठलीही प्रतिकूल परिस्थिती रोखू शकत नसल्याचे सांगून त्यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले, सतत प्रेरणादायी व्यक्तीच्या, वातावरणाच्या सहवासात राहुन  आत्मविश्वास दृढ करुन तयारी करा, जिल्हा प्रशासन आपल्या पाठिशी असून सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आम्ही कटीबद्ध असल्याचे सांगितले. याचसोबत तालुकास्तरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांसारखा स्पर्धा परिक्षेच्या सोई उपलब्ध करुन देण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी यावर मार्गदर्शन केले. प्रा. सुजीत पवार पुणे यांनी सर्वसाधारण बुध्दिमता गणीत या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तरपणे  मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, सूत्रसंचलन मुक्तीराम शेळके आभार आरती कोकुलवार यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रताप सुर्यवंशी, अजय ट्टमवार, कोंडीबा गाडेवाड, खंडेलोटे, लक्ष्मण शेनेवाड, सोपान यनगुलवाड आदीने सहकार्य केले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...