Friday, February 2, 2018

महिला उद्योजकांना पुरस्कारासाठी   
अर्ज करण्यास 5 फेब्रुवारीची मुदत   
नांदेड दि. 2 :-  महिला उद्योजकांसाठी राज्याचे विशेष धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणानुसार सुक्ष्म, लघु मध्यम उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला उद्योजकांना प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक महिला उद्योजकांनी सोमवार 5 फेब्रुवारी 2018 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज, कागदपत्रासह महाव्यवस्थापक  जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन नांदेड येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील पात्रता निकष र्ण करणाऱ्या महिला उद्योजक अर्ज करण्यास पात्र राहतील. शासन निर्णय 14 डिसेंबर 2017 मध्ये विहित करण्यात आलेली महिला उद्योजकांची व्याख्या लागू राहील. एकल मालकी घटक - महिला उद्योजकांचे 100 टक्के भाग भांडवल. भागीदारी घटक - भागीदारी घटक ज्यामध्ये  100 टक्के भाग भांडवल. सहकारी क्षेत्र- सहकारी कायद्यांतर्गत ज्या सहकारी संस्थेमध्ये 100 टक्के महिला उद्योजकांचा समावेश असलेली संस्था. खाजगी किंवा सार्वजनिक मर्यादित घटक- ज्या घटकामध्ये महिला उद्योजकांचे किमान 100 टक्के भाग भांडवल असेल अशी कंपनी. स्वयं सहाय्यता बचत गट - जो बचत गट नोंदणीकृत असून, सदर व्याख्येतील क्रमांक 3 आणि 4 नुसार स्थापित झालेले आहे. उद्योगांच्या या नमुद केलेल्या घटकांमध्ये किमान 50 टक्के महिला कामगार असलेल्या उपक्रमांना योजनेतर्गत प्रोत्साहनासाठी पात्र समजण्यात येईल. उद्योग घटक गेल्या 3 वर्षात सतत उत्पादनात असावा. महिला उद्योग घटकास राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत यापूर्वी कुठलाही पुरस्कार मिळालेला नसावा. उद्योग घटकाची निवड करताना विविध मुद्यांचा समावेश करण्यात येईल. जसे गेल्या 3 वर्षात घटकाचे उत्पादन, रोजगार निर्मिती, गुंतवणुक नफा याद्वारे दिलेल्या वाढीचा दर, तंत्रज्ञानाची निवड वापर ( स्वत: विकसीत केलेले, स्वदेशी, परदेशी ), उद्योजकची पार्श्वभुमी, प्रथम पिढीची उद्योजिका आहे किंवा कसे ? उद्योग उभारणीत स्वावलंबित्व उद्योगाच्या स्थानाची निवड, उत्पादनाचा विकास (संशोधन विकासासाठीचे प्रयत्न, गुणवत्ता नियंत्रणासाठीची उपाय आदी), आयात  पर्यायी उत्पादन निर्यात, डायर्व्हसिफीकेशन बाजारपेठेत नव्या उत्पादनाचा यशस्वीपणे समावेश, उद्योगाचे व्यवस्थापन यामध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल, लेखे, मार्केटिंगबाबत, कामगार कल्याण, उद्योजिका अनु.जाती, अनु.जमातीची असल्यास अधिकचे गुण आदी निकषांचा विचार करुन पुरस्कार देण्यात येतील. फेब्रुवारी 2018 मध्ये मुंबई येथे आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स- 2018 समारंभात पुरस्कार स्वरुपात सन्मानपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ( दुरध्वनी नंबर 02462 250056 E-mail- didic.nanded@maharashtra.gov.in) येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...