Friday, January 26, 2018

जिल्हा रुग्णालयात तंबाखू मुक्त प्रतिज्ञा
नांदेड, दि. 27 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूजन्य पदार्थापासून होणाऱ्या दुष्परिणामाबाबत अवगत करून देणे व कोट्पा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हा रुग्णालय नांदेड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना तंबाखू मुक्त प्रतिज्ञा देण्यात  आली.
 यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे दुष्परिणामाबद्दल मार्गदर्शन केले. उपस्थितांनी तंबाखू सेवन न करण्याचा संकल्प करुन आजूबाजूचा परिसर तंबाखू मुक्त ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली.
00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   394 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई   ·    ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन     नांदेड (जिमाका) दि. 2 9 :-   राष्...