Tuesday, October 31, 2017

वाहनांचे ब्रेक, वाहन तापसणी चाचणी
आजपासून वाघी येथे घेण्यात येणार
नांदेड दि. 31 :- नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नांदेड तालुक्यातील मौ. वाघी येथील शासकीय जागेवर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारला आहे. नांदेड तसेच परभणी जिल्हयातील सर्व वाहतूकदारांची बुधवार 1 नोव्हेंबर 2017 पासून मौजे वाघी येथील शासकीय जमिनीवर बांधण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकवर योग्यता प्रमाणपत्रासाठी  परिवहन संवर्गातील वाहनांचब्रेक वाहन तपासणीची चाचणी घेण्यात येणार आहे.
मा. उच्च न्यायालयाने 18 फेब्रुवारी 2016 त्यानंतर वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशान्वये परिवहन वाहनांचे ब्रेक तपासणी योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेणे आवश्यक आहे. ही तपासणी 1 नोव्हेंबर 2017 पासून त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही खाजगी जागेत अथवा सार्वजनिक रस्त्यावर घेण्यात प्रतिबंधित करण्यात आले आहे. नांदेड, परभणी जिल्हयातील सर्व वाहतूकदारांना वाहने तपासणीसाठी मौजे वाघी येथे नेण्यात यावीत. ही कार्यपध्दती पुढील आदेश होईपर्यंत चालू राहणार आहे.  परिवहन संवर्गातील वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र तनीकरणासाठी परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in/appointment/vahan या संकेतस्थळावर अपॉईंटमेंट घेऊनच कागदपत्रया कार्यालयात सादर करण्यात यावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...