Tuesday, September 19, 2017

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी
मॉक मुलाखतीचे आयोजन
नांदेड दि. 19 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक या पदाच्या मुख्य परिक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या मॉक मुलाखतीचे आयोजन शनिवार 23 व रविवार 24 सप्टेंबर रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे केले आहे. मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोफाइलची प्रत सेतू समिती अभ्यासिका किंवा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड याठिकाणी 22 सप्टेंबरपर्यंत जमा करुन आपली नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेतंर्गत या मॉक मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा. पुणे येथील प्रा. मनोहर भोळे यांचे मुलाखत विषयीचे मार्गदर्शन सत्र होणार आहे.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. यादिवशी सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत रविवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून मॉक मुलाखती घेतल्या जातील. मुलाखत मंडळामध्ये प्रा. मनोहर भोळे, पोलिस उपअधिक्षक अशोक बनकर, उपअधिक्षक भूमि अभिलेख बळवंत मस्के, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, पोलिस उपनिरिक्षक बालाजी चंदेल, अप्पर कोषागार अधिकारी विशाल हिवरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांचा समावेश आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...