Tuesday, September 19, 2017

ग्रामपंचायत मतदानासाठी
7 ऑक्टोंबरला स्थानिक सुट्टी 
नांदेड दि. 19 :- ग्रामपंचायत निवडणुका जेथे नियोजित आहेत तेथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील 171 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, त्या मर्यादीत क्षेत्रापुरती शनिवार 7 ऑक्टोंबर रोजी स्थानिक सुट्टीची अधिसुचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढली आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबर ते डिसेंबर 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 171 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक मतदानाचा दिवस हा कार्यालयीन कामाचा दिवस असल्याने ही स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  

00000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...