Saturday, July 22, 2017

उच्च शिक्षण विभागांतर्गत  
  29 जुलैला शिष्यवृत्ती कार्यशाळा    
           नांदेड, दि. 22 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उच्च शिक्षण नांदेड विभागांतर्गत नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ कला वाणिज्य, विज्ञान अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत  महाविद्यालयातील  संगणक हाताळणारे कर्मचारी तसेच ईबीसी शाखेतील कर्मचाऱ्यांसाठी  शनिवार 29 जुलै 2017 रोजी नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाची ग्रंथालय इमारत येथे सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत शिष्यवृत्तीबाबत कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. महाविद्यालय प्राचार्य व संस्था प्रमुखांनी कार्यशाळेस संबंधीत कर्मचाऱ्यांना पाठवावे, असे आवाहन सहासंचालक डॉ. मोहन खताळ यांनी केले आहे.  
            आपले सरकार पोर्टलद्वारे MahaDBT शिष्यवृत्ती योजना सन 2017-18 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अल्पसंख्याक पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती (मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी, जैन ) व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ईबीसीधारक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी माहिती देण्यासाठी उच्च शिक्षण नांदेड विभागांतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  

0000000

No comments:

Post a Comment