Wednesday, April 26, 2017

नांदेड-हैद्राबाद विमानसेवेचा आज
प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते प्रारंभ
उडानचे व्हिडीओलिंकींगद्वारे उद्घाटन
नांदेड दि. 26 :- ‘उडान- उडे देश का आम नागरिक या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील नांदेड –हैद्राबाद विमान सेवेचा गुरूवार 27 एप्रिल 2017 रोजी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. व्हिडीओलिंकीगद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सकाळी 11.15 वाजता विमान सेवेचे उद्घाटन करतील.
यानिमित्ताने नांदेड येथील गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राज्याच्या ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे तसेच कामगार, भुकंप, पुनर्वसन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासह राज्याचे वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार डी. पी. सावंत आदी मान्यवरांचा विशेष निमंत्रितात समावेश राहील.  
उडानमध्ये समाविष्ट नांदेड-हैद्राबाद या विमान सेवेसह, शिमला ते दिल्ली तसेच शिमला ते कडपा या विमानसेवेचाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिमला येथून प्रारंभ करण्यात येईल. या कार्यक्रमाचे व्हिडीओलिंकींगद्वारे थेट प्रक्षेपण कार्यक्रमात होणार आहे.
000000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...