Friday, March 24, 2017

जालना येथील सैन्य भरतीसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 24 :-  सैन्यभरती सोल्जर जीडी, सोल्जर टेक्रीकल, सोल्जर क्लार्क, एसकेटी व सोल्जर ट्रेडसमॅन या पदासाठी होत आहे. नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी पात्रतेसंबंधी www.joinindianarmy या संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी. ऑनलाईन अर्ज मंगळवार 11 एप्रिल 2017 पर्यंत भरावेत. ऑनलाईन अर्ज भरणे झाल्यावर जिल्हा व तालुका भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
सैन्य भरती कार्यालय औरंगाबाद यांच्याकडून सैन्य भरतीचे आयोजन जालना येथे गुरुवार 27 एप्रिल ते रविवार 7 मे 2017 या कालावधीत करण्यात आले आहे. ही सैन्य भरती नांदेड, हिंगोली, जालना, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, बुलढाणा व जळगाव या नऊ जिल्ह्यासाठी आहे.
पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनमान्य माजी सैनिक महामंडळ संचलित मेस्को करीअर ॲकडमी सातारा व बुलढाणा येथे अल्पदरात 6 हजार 500 रुपयात एक महिन्याची ट्रेनींग दिली जाते. यामध्ये भोजन, निवास व ट्रेनिंग शुल्क समाविष्ट आहे. याचा युवकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर व्ही. व्ही. पटवारी यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...