Friday, March 24, 2017

जिल्ह्यात 8 एप्रिल रोजी
राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
नांदेड दि. 24 :- जिल्हा न्यायालय नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार 8 एप्रिल 2017 रोजी आयोजित करण्यात आलआहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढुन आपला पैसा, वेळ वाचवावा या राष्ट्रीय लोकअदालतीच्या रूपाने चालून आलेल्या  संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा सत्रन्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.
मागील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये मिळालेले यश पाहता यावेळी देखील ऱ्या मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एस. आर. नरवाडे यांनी व्यक्त केला असून पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात दाखलपुर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधी सेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड या कार्यालयाकडे फक्त एक अर्ज देवून आपले प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्याची विनंती करावी. यासाठी आपणास कुठलीही शुल्क आकारण्यात येणार नाही. या अदालतीत तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, चेकबाऊंसची प्रकरणे (138 एन.आय.अॅक्ट), बॅंक रिकव्हरी, दिवाणी प्रकरणे: भूसंपादन, महसूल प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, मनपा, नपा प्रकरणे, विद्युत आणि पाणीपट्टी प्रकरणे तसेच विविध बॅंकांची, फायनान्स कंपन्याची प्रलंबित दाखल पूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, ..पा. अधिकारी, र्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विमा कंपन्याचे अधिकारी, बॅंक अधिकारी संबंधित सर्व पक्षकारांना या राष्ट्रीय लोकअदालतीत परस्परांतील वाद मिटविण्याची या लोकन्यायालयाच्या रुपाने संधी चालून आली आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे       

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...