Monday, October 10, 2016

राज्य ग्राहक आयोगाकडील
गैरन्यायिक सदस्य पदासाठी अर्ज मागविले
   नांदेड, दि. 10 :- राज्य ग्राहक वाद निवारण आयोग महाराष्ट्र यांच्याकडील गैरन्यायिक सदस्यांची पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्याकरीता प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्यावतीने देण्यात आली आहे.
या गैरन्यायिक सदस्य पदाकरीता ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 तसेच सुधारीत महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम 2000 च्या संबंधीत तरतुदी लागू आहेत. उमेदवारांची अर्हता, पात्रतेचे निकष यासंबंधीची माहिती व विहित नमुन्यातील अर्ज नांदेड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्याकडे आवश्यक शुल्क 100 रुपये भरल्यास उपलब्ध होवू शकतील.
तसेच संपूर्ण तपशिलासह भरलेले अर्ज प्रबंधक राज्य ग्राहक वाद निवारण आयोग महाराष्ट् राज्य मुंबई यांचे कार्यालयात 4 नोव्हेंबर 2016 पर्यंत पोहचणे आवश्यक आहे. याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी. अधिक माहिती व तपशीलसाठी इच्छुकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नांदेड रुक्मिणी कॉम्पलेक्स, व्हीआयपी रोड नांदेड येथे संपर्क साधावा.  

000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...