Monday, October 10, 2016

जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीतील
 आरक्षीत जागांचा मसुदा जाहीर ; हरकती मागविल्या  
नांदेड, दि. 10 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आरक्षीत जागांबाबतचा मसुदा जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा परिषद नांदेड, सर्व तहसिल कार्यालय,  सर्व पंचायत  समिती  कार्यालय या ठिकाणी प्रसिद्धी करण्यात आला असून त्याबाबत कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास ती गुरुवार 20 ऑक्टोंबर 2016 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961, (1962 चा अधिनियम 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्‍वये  नांदेड जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी  जिल्‍हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम 58 (1) (अ) अन्‍वये पंचायत समित्‍यामधील निर्वाचक गणांची रचना व एकुण सदस्‍य संख्‍या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह राखून ठेवण्‍यात आलेले  जिल्‍हा परिषद निवडणूक विभागाच्‍या प्रभागरचना व आरक्षणाचे परिशिष्‍ट 11 (अ) व पंचायत समिती निर्वाचक गणाची प्रभागरचना व आरक्षणाचे परिशिष्‍ट 12 (अ) ची प्रत दि. 10 ऑक्टोंबर 2016 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा परिषद नांदेड, सर्व तहसिल कार्यालय,  सर्व पंचायत  समिती  कार्यालयातील  नोटीस बोर्डावर प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे.   
या आदेशाच्‍या मसुदयास कुणाची हरकत  किंवा सूचना असल्‍यास त्‍यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) दुसरा मजला जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांचेकडे गुरुवार 20 ऑक्टोंबर 2016 पर्यंत सादर करावीत. तारखेनंतर जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे आलेले निवेदन,  हरकती, सूचना इत्‍यादी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...