Wednesday, January 14, 2026

इसापूर तांडा येथे चित्ररथाच्या माध्यमातून ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या जनजागृतीस प्रारंभ

हिंगोली, दि. 14 (जिमाका) : ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांच्या 350 व्या शहीद समागम निमित्त हिंगोली जिल्ह्यात ‘हिंद दी चादर’ या विशेष कार्यक्रमांतर्गत आज इसापूर तांडा येथे प्रचाररथांची विधिवत पूजा करून हिरवा झेंडा दाखवत जनजागृतीस प्रारंभ करण्यात आला.   

नांदेड येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे सन २०२५–२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व गुरु नानक नाम सेवा संगत (सिख, सिकलकरी, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल) तसेच इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी  येथील मोदी मैदान (सार्वजनिक बांधकाम विभागाची मोकळी जागा, आसर्जन) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

हिंगोली तालुक्यातील इसापूर तांडा येथे पोहोचून नागरिकांशी भेटीगाठी व हिंद दी चादर या नांदेड येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी हा चित्ररथ पुढे रवाना करण्यात आला. या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांच्या त्याग, बलिदान व धर्मस्वातंत्र्याच्या संदेशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

या प्रसंगी रामेश्वर जाधव, रामलाल राठोड, मोहन जाधव, यशवंत चव्हाण,  दशरथ राठोड, लालसिंग राठोड, वसंत महाराज यांच्यासह भजनी मंडळी उपस्थित होती. तसेच यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 00000



No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...