Thursday, January 22, 2026

वृत्त क्रमांक 83

‘'हिंद-दी-चादर'’ कार्यक्रमानिमित्त नांदेड शहरातील आठवडी बाजार 25 जानेवारी रोजी बंद

नांदेड, दि. 22 जानेवारी :- “'हिंद-दी-चादर'” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहीदी समागम राज्यस्तरीय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली शीख, सिखलकरी, बंजारा-लमान, मोहियाल, सिंधी तसेच इतर सर्व समाजांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी मैदान, आसरजन येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास देशातील पंजाब तसेच इतर राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नांदेड शहरातील मोदी मैदान, रेस्ट हाऊस परिसर, सचखंड गुरुद्वारा, गुरु गोविंद सिंगजी विमानतळ, बसस्थानक, जुना मोंढा परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट, १८६२ मधील कलम ५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड शहरात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदर आठवडी बाजार सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी भरविण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. हा आदेश दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आला आहे.

000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...