Saturday, January 3, 2026

 वृत्त क्रमांक 10

नांदेड शहरात जड वाहनांना पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेशबंदी   

नांदेडदि. जानेवारी :- मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबधीत विभागाने नमूद उपाययोजना करुन नांदेड शहरात पहाटे ५ ते रात्री १० या वेळेत ७ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अत्यावश्यक सेवा वाहने वगळता इतर जड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. याबाबतची अधिसुचना 31 डिसेंबर 2025 रोजी निर्गमीत करण्यात आली आहे. 

या अधिसुचनेनुसार जड वाहनामुळे शहरात वाहतुक कोंडीअपघात अशा समस्या उद्भवत आहेत. जड वाहनामुळे शहरातील वाहतुक कोंडी व जड वाहन अपघातामुळे होणारी जिवीत हानी याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयास विविध संघटनेकडूनजनतेकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. तसेच दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत या संबंधाने माझे समवेत पोलीस अधिक्षक नांदेडमार्ग परिवहन अधिकारी नांदेड यांचेशी झालेल्या चर्चेनुसार सदरील समस्येवर उपाययोजना करण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी जड वाहनांना नांदेड शहरात पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्याचे विचाराधीन होते. 

उपाययोजना

पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करावी. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी रस्ता वाहतूक प्रतिबंधसाठी आवश्यक असलेले बोर्डचिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही करावी, असेही अधिसूचनेत जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी नमूद केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...