वृत्त क्रमांक 1335
सैनिकी मुलांचा वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती
नांदेड दि. 31 डिसेंबर
:- सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णूपुरी नांदेड येथील वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने माजी
सैनिक, माजी सैनिक अवलंबित मधुन सफाई कामगाराचे एक पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी
माजी सैनिक/माजी सैनिक अवलंबित उपलब्ध नसल्यास हे पद नागरी (सिविलन) संवर्गातून भरण्यात
येईल. यासाठी वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे असून कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात
येईल. इच्छुक उमेदवाराने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे सोमवार 5 जानेवारी
2026 पर्यंत अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02462-359056 किंवा
भ्रमणध्वनी क्रमांक 8380873985, 8999638872 वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी
तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment