Sunday, August 17, 2025

दि. 16 ऑगस्ट 2025 

आज पहाटे तीन वाजता पासून ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार स्वरूपात पाऊस सूरू आहे. त्यामुळे धरणाच्या वरील बाजूस असलेल्या जयपुर बंधा-याच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यानुषंगाने येणारा येवा लक्षात घेऊन 16 ते 31 ऑगस्ट साठीच्या मंजूर द्वार प्रचालन (ROS) नुसार धरण पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याचे दृष्टीने अतिरिक्त पाणी ईसापूर धरणाच्या सांडव्याचे वक्र द्वारे 9:00 वाजता ऊघडून पेनगंगा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.

-------

🚫 ALERT 🚫

🚫 विसर्ग संदेश 🚫

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प

ईसापुर धरण

आज दि. 16/08/2025 रोजी ठीक 09.00 वाजता इसापूर धरणाच्या सांडव्याची  3 वक्रद्वारे   50 सेंटिमीटर ने उघडण्यात आली असून सद्यस्थितीत पेनगंगा नदीपात्रात 4988 क्यूसेक्स  (141.229 क्यूमेक्स )इतका विसर्ग  सोडण्यात आला आहे.

धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.

ईसापुर धरण पुरनियंत्रण कक्ष

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...