Tuesday, July 15, 2025

  वृत्त क्र. 728

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या

 प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषीत

निवेदने, हरकती, सूचना 21 जुलैपर्यत सादर करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 15 जुलै : नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रारुप प्रभाग रचना 14 जुलै 2025 रोजी परिशिष्ट 5 (अ) व 5 (ब) मध्ये पुढील ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रारुप प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, जिल्हा परिषद नांदेड यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, संबंधित तहसिल कार्यालयाच्या बोर्डावर, संबंधित पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https:nanded.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग रचनेस मसुद्यास कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व संबंधित तहसिल कार्यालय येथे 21 जुलै 2025 पर्यत सादर करावेत. त्यानंतर आलेली निवेदने, हरकती, सूचना इत्यादी विचारात घेतली जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

  

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...