Wednesday, June 4, 2025

वृत्त क्रमांक 570

सारथीमार्फत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी 

महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून

जागतिक स्तरावर उच्च शिक्षणासाठी जाता येणार 

नांदेड दि. 4 जून :- मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत पुरवणारी महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी सारथीच्या fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज 16 जून 2025 पर्यत सादर करावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ही योजना मराठा-कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.  

अर्ज प्रक्रीया आणि मदत

शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्प्रिंग 2025 (एप्रिल/मे 2025), 2025(जुलै/ऑगस्ट/सप्टेंबर 2025) आणि 2026 (जानेवारी ते मार्च 2026) या कालावधीत प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करु शकतात.

योजनेचा उद्देश आणि व्याप्ती

ही योजना मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएचडी QS World University Ranking मध्ये 200 च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. यामध्ये 50 जागा पदव्युत्तर पदवी/पदवीका आणि 25 जागा पीएचडी च्या विविध अभ्यासक्रमासाठी राखीव आहेत.

शिष्यवृत्तीचे स्वरुप  

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता आणि वैयक्तीक आरोग्य विमा यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. प्रतिवर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल 30 लाख रुपये आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी कमाल 40 लाख रुपये या मर्यादेत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

पात्रता निकष 

नागरिकत्व आणि रहिवास लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील महाराष्ट्राचा रहिवासी आणि भारतीय नागरिक असावा.

शैक्षणिक पात्रता

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावी.

वयोमर्यादा : पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वय 35 वर्ष आणि पीएचडी साठी 40 वर्ष

उत्पन्न मर्यादा

 कुटूंबाचे मागील आर्थिक वर्षातील सर्व मार्गानी प्राप्त एकूणप वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.

विद्यापीठ प्रवेश पात्रता 

क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकींग 200 च्या आत असलेल्या परदेशी विद्यापीठात पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी अनकन्डींशनल ऑफर पत्र असणे आवश्यक आहे.

इतर अटी

यापूर्वी कोणतीही राज्य किंवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. अर्धवेळ किंवा एक्झिक्युटीव्ह अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थी पात्र ठरणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज, सक्षम प्राधिकाऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला आणि आयटीआर 2025-26, फार्म नं. 16, दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवीच्या गुणपत्रिका इतर आवश्यक दाखले, परदेशी विद्यापीठाचे बिनशर्त ऑफर पत्र, विद्यापीठाच्या माहिती पत्रकाची प्रत, अद्यावत QS World University Ranking ची माहिती.

विशेष सूचना

विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रासाठी प्रगती अहवाल आणि खचा्रची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाई आणि खर्चाची व्याजासह वसुली केली जाईल.

संपर्क 

अधिक माहितीसाठी सारथीच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा सारथीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. सारथी कार्यालयाचा संपर्क क्रमांक -0220-25592507 असा आहे.

000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...