Friday, April 4, 2025

 वृत्त क्रमांक 349

उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात 

भू-प्रणाम केंद्राचे महसूलमंत्र्याचे हस्ते उद्घाटन

नांदेड दि. 4 एप्रिल  :-  उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड कार्यालयात भू-प्रणाम केंद्राचे उदघाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते आज दुरदृश्यप्रणाली द्वारे करण्यात आले करण्यात आले. 

या भू- प्रणाम केंद्रात भूमि अभिलेख विभागाचे सर्व प्रकारचे नक्कला नागरिकांना वेळेत मिळतील. तसेच मोजणी अर्ज भरता येतील, त्यामुळे नागरिकांचा वेळ कमी होईल. अशा अनेक सुविधा या भु-मापन केंद्राद्वारे मिळतील. 

उदघाटन प्रसंगी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती सिमा देशमुख नांदेड, उप अधीक्षक भूमी अभिलेख बी व्ही मस्के व कार्यालयातील कर्मचारी  व इतर अधिकारी उपस्थित होते.

00000



No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...