Tuesday, January 28, 2025

 वृत्त क्रमांक  113 

गतिशील व दायित्वपूर्ण प्रशासनाचे

100 दिवसांचे नियोजन पूर्ण करा : मेघना बोर्डीकर

 

राज्यमंत्र्यांनी घेतला विविध विभागाचा आढावा

 

नांदेड दि. 28 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी निर्धारित केलेल्या सात सूत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची नांदेडमध्येही गतीशील व दायित्व पूर्ण अंमलबजावणी कराअसे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज येथे केले.

 

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणपाणी पुरवठा आणि स्वच्छताऊर्जामहिला आणि बालकल्याणसार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचा नांदेड येथील आजचा प्रथम दौरा होता. त्यांनी नियोजन भवन येथे आज विविध विभागांचा आढावा घेतला. या बैठकीला खासदार अजित गोपछडेजिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालमहानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडेनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

यावेळी अधीक्षक अभियंता महावितरणमहापारेषणकार्यकारी अभियंता जलजीवन मिशनपाणीपुरवठा विभागनांदेड कार्यकारी अभियंतामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेडउपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारीजिल्हा परिषद. जिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारी कार्यकारी अभियंता महावितरण व महापारेषणवरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि यंत्रणा जिल्हा समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळ आदी विभागांचा त्यांनी आढावा घेतला. खासदार अजित गोपछडे यांनीही यावेळी अनेक योजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात उत्तम प्रशासनाचे 100 दिवस हा संकल्प पुढे ठेवण्यात आला आहे. 7 कलमी कार्यक्रम त्यासाठी दिला गेला आहे. या शंभर दिवसांमध्ये प्रशासनामध्ये झालेला बदल दर्शनी दिसला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांचे व्यवस्थित स्वागत झाले पाहिजेसर्व वेबसाईट अपडेट असाव्यातकार्यालयाची स्वच्छता व प्राथमिक सुविधा परिपूर्ण असल्या पाहिजे. पारदर्शी व उद्दिष्टपूर्ण कार्यप्रणाली आत्मसात केली पाहिजे,अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी केल्या.

 

विविध विभागाच्या सादरीकरण संदर्भात त्यांनी समाधान व्यक्त केले. तथापिकागदावरचा विकास प्रत्यक्षात उतरण्यासाठी 100 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार नियोजन करण्याचे त्यांनी आदेश दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण  मिसाळ यांनी केले.

00000










No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...