Saturday, October 5, 2024

वृत्त क्र. 907

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावरून प्रस्थान

नांदेड दि. 5 ऑक्टोबर :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुपारी 2.45 ला गुरूगोविंदसिंघजी विमानतळावरून मुंबईसाठी प्रस्थान केले.  

गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर पोहरादेवी येथून हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन झाले.आगमनानंतर त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ.चंद्रशेखर बावनकुळे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज दुपारी ठाणे येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ठाणे येथील कार्यक्रमासाठी यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ.चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर त्यांच्या सोबत रवाना झालेत.

00000









 

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...