Tuesday, April 9, 2024

वृत्त क्र. ३१९

 निवडणूक निरीक्षकांची विष्‍णुपूरी इकोफ्रेंडली मतदान केंद्रास भेट 

नांदेड दि. ९ एप्रिलः - १६- नांदेड लोकसभा निवडणुकीचे सामान्‍य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी नांदेड दक्षिणच्या २५३ मतदान केंद्र विष्णुपूरीस आज भेट दिली. संपूर्णतः पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली मतदान केंद्राची केलेली नैसर्गिक रचना पाहून मिश्रा यांनी या केंद्रावरील मतदान टक्केवारी पूर्वीपेक्षा नक्कीच वाढणार, असा विश्वास व्यक्त केला. या भेटीदरम्यान त्यांनी मतदान केंद्राची तयारी आणि निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली.

 

यावेळी निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी मतदान केंद्राचे निरीक्षण केले आणि मतदान अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, 087 स्वीप कक्षाचे प्रमुख रुस्तुम आडेसदस्य संजय भालकेमुख्याध्यापक उज्ज्वला जाधवदिनेश अमिलकंठवारग्राम विकास अधिकारी संजय कानोडेपर्यवेक्षक शिवाजी वेदपाठकमतदार विलास हंबर्डेगोविंदराव हंबर्डे उपस्थित होते.

 

निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी मतदान केंद्रावरील सुविधामतदार यादीमतदान यंत्रे आणि इतर साहित्याची तपासणी केली. मतदान केंद्राची व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेची तयारी पाहून समाधान व्यक्त केले. या भेटीमुळे मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत विश्वास निर्माण होण्यास मदत होईल. तसेच या भेटीमुळे 16 नांदेड लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि पारदर्शकपणे पार पाडण्यास मदत होईलअसा विश्वास त्‍यांनी व्यक्त केला. या भेटीचे अहवाल लेखन राजेश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद वळगेदत्ता केंद्रेउदय हंबर्डेविकास दिग्रसकरमारोती काकडेपंचफुला नाईनवाडकांचनमाला पटवे आदींनी परिश्रम घेतले.

०००००






No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 425   टंचाई निवारणाची कामे लोकसहभागातून हाती घ्यावीत -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत   •  आंदेगाव येथील नाला खोलीकरणाच्या कामास जिल्ह...