Sunday, April 14, 2024

 वृत्‍त क्र.  338 

बंदोबस्‍त वाढवला फिरत्‍या पथकांकडून 

आतापर्यंत 57 लाखांचा मुद्येमाल जप्‍त

 

49 लाखाची रोकडसाडेचार किलो चांदीसाडेचार लाखाचे सोने जप्‍त

 

नांदेड दि. 14 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त वाढविण्‍यात आला असून फिरत्‍या पथकांकडून मोठ्याप्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

 

निवडणूक काळात नागरिकांनी व्यापाऱ्यांनीव्यावसायिकांनी कोणतेही सामान सोबत ठेवतांना त्‍यासंदर्भाचे दस्‍तऐवज सोबत ठेवावेतअसे आवाहन प्रशासनाने केले आहे. आतापर्यंत 57 लाखांचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला असून यामध्‍ये साडेचार किलो चांदी व साडेचार लाखाचे सोन्‍यांचा समावेश आहे.  

 

नांदेड जिल्‍ह्याची सिमा ही अन्‍य राज्‍याच्‍या सिमेसोबत लागली असल्‍यामुळे आणखी काटेकोर तपासणी करण्‍यात येत आहे. 13 एप्रिलच्‍या रात्री उशिरापर्यंत प्राप्‍त आकडेवारी नुसार आतापर्यंत जवळपास साडेचार किलो चांदी पकडण्‍यात आली आहे याची किंमत 3 लाख 2 हजार 45पकडलेल्‍या सोन्‍याची किंमत 4 लाख 44 हजार 220 तर आतापर्यंत पकडलेल्‍या रोकडची किंमत 49 लाख 95 हजार 700 एवढी आहे. ही एकुण किंमत 57 लाख 41 हजार 965 एवढी जातेअशी माहिती सि-व्हिजील कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 425   टंचाई निवारणाची कामे लोकसहभागातून हाती घ्यावीत -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत   •  आंदेगाव येथील नाला खोलीकरणाच्या कामास जिल्ह...