Wednesday, February 28, 2024

 वृत्त क्रमांक 177 

भोगवदार रुपांतर करण्‍याची अंतिम मुदत मार्च  

 

नांदेड दि. 28 :- ज्‍या अर्जदार, खातेदार, संस्‍था यांना त्‍यांची जमीन भोगवटदार वर्ग-2 चे धारणाधिकार भोगवटदार वर्ग-1 मध्‍ये रुपांतरीत करुन घ्यावयाची असल्‍यास त्‍यांनी दिनांक 7 मार्च 2024 पर्यंत संबंधीत तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अधिमूल्‍याच्या रक्‍कमेचा भरणा करुन या अधिसूचनेनुसार शासकीय सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.

 

"महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणे) नियम 2019" दिनांक 8 मार्च 2019 महसूल व वनविभागाच्या अधिसूचनेनुसार भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-1 मध्ये सवलतीच्या दराने रुपांतरीत करण्याचा कालावधी हा अधिसूचनेच्या दिनांकापासून 3 वर्षापर्यंत दिला होता. त्‍यानंतर महसूल व वन विभागाची अधिसूचना दि. 27 मार्च, 2023 अन्वये सवलतीच्या दराने भोगवटदार वर्ग-2 चे धारणाधिकार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्याबाबतचा कालावधी हा 3 वर्षाऐवजी 5 वर्ष करण्यात आला आहे. सदरील अधिसूनेचा कालावधी दिनांक 7 मार्च 2024 रोजी संपुष्टात येत आहे.

 

त्‍यामुळे भोगवटदार वर्ग-2 चे धारणाधिकार भोगवटदार वर्ग-1 मध्‍ये रुपांतर करुन मिळणेबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयात ज्‍या अर्जदारांनी, संस्‍थेनी अर्ज केला असल्‍यास त्‍याप्रकरणामध्‍ये अधिमूल्याची रक्कम 7 मार्च पूर्वी शासन खाती भरणा करुन सदरील अधिसूचनेतील सवलतीचा लाभ घ्‍यावा. जे अर्जदार, संस्था भोगवटदार वर्ग-2 चे भोगवटदार वर्ग-1 मध्‍ये रुपांतर करण्‍याबाबत अधिमुल्‍यांची रक्‍कम दिनांक 7 मार्च 2024 पूर्वी शासन खाती भरणा करणार नाहीत त्‍यांना उक्‍त अधिसूचनेनुसार दिलेल्या सवलतीच्या दराचा लाभ मिळणार नाही, असे उपसचिव महाराष्‍ट्र शासन महसूल व वन विभागाचे पत्र दिनांक 21 फेब्रुवारी 2024 मध्‍ये नमूद केले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...