Thursday, February 8, 2024

वृत्त क्र. 115

 समाज कल्याण कार्यालया मार्फत विविध महामंडळांचा

एक दिवशीय जिल्हास्तरीय समन्वय मेळावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कर्ज मंजूरी देण्याबाबत एक दिवसीय समन्वय मेळावा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवननांदेड येथील सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला.

 

या कार्यक्रमासाठी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ए.डी.गचके व तसेच लेखापाल महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे डी.एस. गायकवाड, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी.आर शिंदे, संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळाच्या एस.व्ही श्रीमती कांबळे तसेच बँक आफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया, आयसी आयसी आयजिल्हा ग्रामीण बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया बँकेचे जिल्हा समन्वय अधिकारी व महामंडळाचे बँक पेंडीग लाभार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात महामंडळाच्या लाभार्थ्यांचे कर्ज मंजूरी प्रस्ताव बँकेकडून तात्काळ मंजूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा अग्रणी बँक अधिकारीजिल्हा समन्वय अधिकारी यांनी पेंडींग बँक प्रकरणेमहामंडाळांचे वाटप केलेली सबसीडी वाटप न करणेरिर्टन प्रकरणे व कर्ज मंजूरीचे प्रकरणे, बँक पेंडीग प्रकरणे निकाली काढण्यात येतील, असे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी ए.डी गचके यांनी सांगितले.

 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ यांचेकडील पेंडीग प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच स्टेट बँक इंडीया कडे जे कर्ज प्रकरणे प्रलंबित होती त्यांची यादी देण्यात आली. लवकरात लवकर कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे स्टेट बँक ऑफ इंडीयाबँक ऑफ महाराष्ट्रबँक ऑफ इंडिया, आयसी आयसी आयजिल्हा ग्रामीण बॅक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया बँकेचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी बँकेकडे प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येतील असे उपस्थित लाभधारकांना सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन जिल्हा प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजात पोहरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती एस.व्ही.व्हडगीर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण निरिक्षक श्रीमती एस.व्ही.वडगीर व श्रीमती एस.टी. गच्चे व तसेच महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले. हा एक दिवसीय समन्वय मेळावा सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

0000



No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...