Friday, January 5, 2024

 वृत्त क्र. 18 

महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी

जिल्ह्यातील कलावंता समवेत सोमवारी बैठकीचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती इ. बाबी जनसामान्यापर्यत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

 

या महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे तसेच शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम यासह पोवाडा, भारुड, गोंधळगीत इ. सारखे लोककलेतील विविध प्रकार समाविष्ट असणार आहेत. त्याचबरोबर स्थानिक दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या लोककला, संस्कृती, विविध स्थानिक महोत्सव/सण/कार्यक्रम आणि देशभक्ती गीत, कवितांचे कार्यक्रम/व्याख्याने इ. चा समावेश असणार आहे.

 

नांदेड जिल्हास्तरावरील महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन लोकसहभागीय व्हावे यादृष्टीने जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व जेष्ठ कलावंतासोबत विचारविनिमय करुन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ लोक कलावंत, रंगकर्मी, दिग्दर्शक, नाटककार, संगीतकार, गायक, वादक, नर्तक, नृत्य दिग्दर्शक, कवी-व्याख्याते, इतिहासतज्ञ यांची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 8 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या कॅबिनेट हॉल येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील विविध सांस्कृतीक क्षेत्रातील नामवंत व जेष्ठ कलावंतानी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...