Monday, January 1, 2024

 वृत्त क्रमांक 4 

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेचे अर्ज

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- केंद्रवती अर्थसंकल्प (न्यक्लिअस बजेट) योजना सन 2022-23 व 2023-24 वर्षाच्या गट अ निहाय या कार्यालयास प्राप्त निधीच्या, मंजूर प्रारूप आराखड्याच्या अधिन राहून वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अर्ज 4 जानेवारी पासून सकाळी 9.45 ते 19 जानेवारी 2024 रोजी सायं. 6.15 वाजेपर्यत नांदेड जिल्ह्यातून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे मागविण्यात आले आहे.

 

या योजनांची यादी व योजनानिहाय अर्ज प्रकल्प कार्यालय, किनवट येथील सेवायोजन कक्षात उपलब्ध आहेत. वैयक्तीक लाभाच्या योजना या अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी 85 टक्के अनुदानावर ताडपत्री, फवारणी स्प्रे-पंप, तारकुंपन (काटेरी तार), बोअरवेल, तुषार सिंचन, ठिंबक सिंचन, शेळी गट (3 शेळी व 1 बोकड) खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे व 100 टक्के अनुदानावर अदिम (कोलाम) जमातीच्या लाभार्थ्यासाठी ताडपत्री, फवारणी, स्प्रे-पंप, तारकुंपन, बोअरवेल या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी सदर लाभार्थ्याकडे अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र, शेती विषयक योजनेसाठी सातबारा दाखला व योजनेच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.

 

लाभार्थ्यांनी अर्ज केला म्हणजे त्यांना योजनेचा लाभ मिळेल असे नसून शासनाकडून प्राप्त झालेल्या लक्षांक, निधी व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता विचारात घेवून निवड समितीद्वारे लाभार्थी निवड करण्यात येईल. पात्र व ईच्छूक लाभार्थ्यांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले आहे.

0000  

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...