Tuesday, December 19, 2023

वृत्त क्र. 873

 जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतीसाठी

21 डिसेंबर रोजी उद्योग भवन येथे मेळाव्याचे आयोजन


नांदेड, (जिमाका) दि. 19 :- सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातर्गंत 21 डिसेंबर 2023 रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी 11 ते सायं. 5 या कालावधीत उद्योग भवनपहिला माळा, सहकारी औद्योगिक वसाहतशिवाजीनगरनांदेड येथे आयोजित केला आहे. नांदेड शहरातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

 


वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन जिल्हास्तरावर असे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्व समावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. या योजनेत सन 2023-2024 मध्ये नांदेड जिल्हयास एकूण 900 युवक युवतींना वित्तीय संस्थांच्या माध्यमातून लाभ देण्याचे लक्षांक आहे.

 

या मेळाव्यात कर्ज मंजूरी प्रस्तावअर्ज अपलोड करणे/मंजूरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्राचे व बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे वेबसाईटवरुन डाउनलोड करुन घ्यावीत. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने इ. कागदपत्रासह या मेळाव्यास उपस्थित राहावे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी या योजनेच्या https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी, असे जिल्हा उद्योग केंद्राने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...