Wednesday, November 22, 2023

 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याचे निर्देश   

नांदेड (जिमाका) दि. 22 :- भारतीय संविधानाची नागरिकांना माहिती असावी व त्यासंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी हा दिवस साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी  दिले आहेत. 


या दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन शासकीय कार्यालये, महामंडळे, शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी करण्यात यावे. तसेच वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित कराव्यात. विद्यापीठामधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे. तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी संविधानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रभात फेऱ्यांचे आयोजन करावे. संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरण्यात यावे.  केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व विभाग प्रमुखांनी करावे, असेही निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत.

0000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...