Tuesday, October 3, 2023

दि. 1 ऑक्टोंबर 2023

पोलीस विभागाच्या पुढाकारातून

युवकांच्या साथीने नंदगिरी किल्ला व परिसर झाला स्वच्छ

 

·         एक तारीख एक तास’ मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- स्वच्छता ही सेवा असून जिल्ह्यातील ऐतिहासिकधार्मिक वारसा असलेल्या स्थळांच्या स्वच्छतेसाठी आपण आपली जबाबदारीकर्तव्य समजून पुढे आले पाहिजे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.       

 

महात्मा गांधी जयंती निमित्त शासनाने स्वच्छता ही सेवा’ आणि एक तारीख एक तास’ मिशनला अनुसरुन आज पोलीस विभागाच्या पुढाकारातून 300 युवकांच्या साथीने नंदगिरी किल्ला व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, पोलीस उपविभागीय अधिकारी सुरज गुरवजिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवारएकनाथ पाटील अकॅडमीचे युवककिल्लेदारपत्रकारआदींची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.  

 

उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांच्या पुढाकारातून मागील अनेक दिवसापासून नंदगिरी किल्ला स्वच्छ करण्याची मोहीम सुरु असून यात युवकांनी दिलेले योगदान कौतूकास्पद असल्याचे गौरोद्गार जिल्हा पोलीस श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले. 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्यातील गड-किल्ल्यांची  स्वच्छता करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. त्यानुसार मागील काही महिन्यांपासून पोलीस विभागाच्या पुढाकारातून नंदगिरी किल्ला व परिसराची स्वच्छता मोहिम सुरु आहे. आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेचे महत्व त्यांनी विशद केले. 

 

उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी नंदगिरी किल्ला स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी मनोगत व्यक्त केले. 

 

स्वच्छता ही सेवाएक तारीख एक तास मिशनला अनुसरुन नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी स्वच्छ भारत दिवसाच्या अनुषंगाने 15 सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कालावधीस्वच्छता ही सेवा उपक्रमस्वच्छ भारत मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

00000








No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...