Saturday, September 16, 2023

 आदराची भावना यातच

ज्येष्ठांच्या आनंदी जीवनाचा मार्ग

-         सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे

 

·         मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

55 ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी व सत्कार

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  ज्येष्ठ नागरिक हा समाजातील महत्वाचा घटक आहे. त्यांच्या कष्टावरच कुटूंब उभे राहिले यांची सतत जाणीव ठेवून तरुण पिढीने ज्येष्ठांना आदर व सन्मानाने वागविले पाहिजे. तसेच त्यांच्या आनंददायी जीवनासाठी त्यांना अत्यावश्यक असलेल्या सुविधा वेळेत मिळतील यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त  शिवानंद मिनगीरे यांनी केले. 15 सप्टेंबर रोजी संध्याछाया वृध्दाश्रमात ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी व सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय चिकित्सक डॉ. साहेबराव मोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पी. डी.जोशी पाटोदेकर हे होते. तर प्रमुख अतिथी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी बापू दासरी,  फेस्कॉम अध्यक्ष अशोक तेरकर, संध्याछाया वृद्धाश्रमाच्या सचिव सुरेखा पाटणी  यांची उपस्थिती होती. 


 

या कार्यक्रमात विशेष कार्य केलेल्या श्रीमती काडगेॲड.सिध्दीकीडॉ. काप्रतवार व इतर जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. वृध्दाश्रमातील 55 ज्येष्ठ नागरिकांची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील 12 वैद्यकिय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली . 

 


वृध्दाश्रमातील प्रवेशीत ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यमान भारत  कार्ड काढून देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे सहाय्यक आयुक्त  शिवानंद मिनगीरे यांनी सांगितले. जेष्ठ नागरीकांसाठीच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.  नागरिकांच्या समस्या वरचेवर  गंभीर बनत आहेत. समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येवून काम करण्याची गरज असल्याचे समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी  सांगितले.   तसेच आपण वृद्धांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही डॉ. साहेबराव मोरे यांनी दिली. यावेळी पी.डी. जोशी पाटोदकर यांनी जेष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मागील तीस वर्षाचा आढावा घेतला.


 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अंजली नरवाडे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती गंगातीर यांनी केले. हा कार्यकम यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एम.पी.राठोड झंपलवाडजेटलावार यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदशनाखाली संपन्न झाला. 

0000

 

 

 

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...