Friday, August 18, 2023

 वेतन देयकासाठी कर्मचाऱ्यांची माहिती  

ऑनलाईन आज्ञावलीत नोंदविणे आवश्यक

      

नांदेड (जिमाका) दि. 18 :शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2023 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालय नांदेड मार्फत सुरू करण्यात आले आहेनियोजन विभागाचे शासन परिपत्रक क्रअसांसं-1323/प्र.क्र.71/का.1417 दि. 8 ऑगस्ट 2023 नुसार जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील व त्यांच्या आस्थापनेवरील नियमितनियमितेतररोजंदारीवरीलअंशकालीनमानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दिनांक 1 जुलै 2023 या संदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे.

 

ही माहिती ऑनलाईन नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडून स्विकारण्यात येणार नाहीत. याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावीतसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागारात सादर होत नाहीतअशा सर्व कार्यालयांनी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करावीअधिक माहितीसाठी उपसंचालकजिल्हा सांख्यिकी कार्यालयनांदेड 02462-252775 -मेल dso.nanded88@gmail.com येथे संपर्क साधावा. कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2023 बाबत ऑनलाईन आज्ञावलीमध्ये माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निखील बासटवार यांनी केले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...