Friday, July 14, 2023

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास

महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळनांदेड कार्यालयाच्यावतीने सन 2023- 24 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना राबविली जात आहे. जिल्ह्यातील मांग/मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील तसेच मांतग समाजातील राज्य स्तरावरील क्रीडा पुरस्कार प्राप्त (महिला व पुरुष) व्यक्तींना व सैन्यदलातील विरगती प्राप्त वारसाच्या एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यासाठी इच्छूक अर्जदाराकडून थेट कर्ज योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज महामंडळाच्या कार्यालयात 10 ऑगस्ट 2023  पर्यत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीतअसे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

 

थेट कर्ज योजनेसाठी भौतिक उदिष्टे लाभार्थी संख्या 90 असून आर्थिक उदिष्टे 90 लाख रुपये आहे. जिल्ह्यातील मांग/मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील इच्छूक अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न लाखापेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने या पूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करुन या योजनेत साधारणपणे समाविष्ट विविध लघु व्यवसाय उदा. मोबाईल सर्व्हिसिंग रिपेरिंग, इलेक्ट्रोशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तु रिपेअरिंग (फ्रीज, एसी, टिव्ही, मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्पुटर) हार्डवेअर, ब्युटीपार्लर, ड्रेस डिजायनिंग, टेलरिंग, फुड प्रोडक्ट प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, मेडीकल स्टोअर्स, फॅब्रीकेशन/वेल्डीग, हार्डवेअर व सेनेटरी शॉप, प्रिंटीग, शिवणकला, झेरॉक्स/लॅमिनेशन, हॉटेल, कॅटरिंग, सर्विसेस, मंडप डेकोरेशन क्रिडा साहित्य/स्पोर्ट शेप, ज्यूस सेंटर, क्लॉथ/रेडीमेट गारमेन्ट शॉप, मोटार मेकॅनिक रिपेअर व शेतीशी निगडीत पुरक/जोड व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहुन दाखल करावेत. त्रयस्त/मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत यांची नोंद घ्यावीअसे महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

 

कर्ज प्रकरणासोबत जोडावयाची कागदपत्रे याप्रमाणे आहेत. जातीची दाखलाउत्पन्नाचा दाखला रेशनकार्डची झेरॉक्स प्रतआधार कार्डपॅन कार्डची झेरॉक्स प्रततीन पासपोर्ट फोटोव्यवसायाचे परपत्रक (कोटेशन)व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडे पावतीकरारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावानमुना नं आठलाईट बिल व टॅक्स पावतीग्रामपंचायत/नगरपालिका/महानगर पालीका यांचे प्रमाणपत्र किंवा शॅाप ॲक्ट परवानाव्यवसाय संबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखलाशैक्षणीक दाखलाअनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्रअर्जदाराचे सीबील क्रेडिट स्कोअर 500 असावाअर्जदाराने आधार कार्ड जोडलेल्या बॅक खात्याचा तपशील सादर करावाप्रकल्प अहवालप्रकरणासोबतची सर्व कागदपत्रे स्वता:च्या स्वाक्षरीने साक्षांकीत करावीएका कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. थेट कर्ज योजनेचे प्रस्ताव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनग्यानमाता शाळेच्या समोरहिंगोली रोडनांदेड या ठिकाणी स्विकारले जातील.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...