Thursday, May 18, 2023

 श्री रेणुका देवीचे दर्शन सुकर व्हावे यासाठी लिफ्टसह स्कायवॉकच्या कामाचे 20 मे रोजी भूमिपूजन

▪️केंद्रीय रस्ते व वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती

▪️18 महिन्यात होणार काम पूर्ण

▪️50 कोटी 60 लाख रुपयाची तांत्रिक मान्यता 

नांदेड, (जिमाका) दि. 18 :- महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर लिफ्टसह स्कायवॉकची सुविधा अवघ्या 18 महिन्यात भक्तांना उपलब्ध होणार आहे. वयोवृद्धज्येष्ठ नागरिकभक्तांसाठी अत्यावश्यक असलेल्या या सुविधेच्या निर्मितीचे भूमीपूजन केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते शनिवार 20 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे. माहूर येथील पुसद मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोरील प्रांगणात सकाळी 10 वा. होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर हे राहतील. 

या समारंभास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजनसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणखासदार हेमंत पाटीलखासदार प्रताप पाटील चिखलीकरखासदार सुधाकर श्रृंगारेविधानपरिषद सदस्य सर्वश्री सतीश चव्हाणविक्रम काळेराम पाटील रातोळीकरविधानसभा सदस्य आ. भिमराव केरामआ. माधवराव पाटील जवळगावकरआ. डॉ. तुषार राठोडआ. शामसुंदर शिंदेआ. मोहनराव हंबर्डेआ. बालाजी कल्याणकरआ. राजेश पवारआ. जितेश अंतापूरकरमाहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फेरोज दोसानी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. माहूर गडावरील या महत्वपूर्ण सुविधेबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन महिन्यापूर्वी नांदेड येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात रेणुका भक्तांना आश्वासीत केले होते. 

अशी आहेत प्रकल्पाची ठळक वैशिष्टे

स्काय वॉकची लांबी 70 मीटर तर रुंदी 15 मीटर असेल.

लोवर स्टेशन लिफ्ट टॉवरची उंची 25 मीटर असून एकुण लिफ्टची 20 प्रवाशी क्षमता असेल.

अपर स्टेशन लिफ्ट टॉवरची उंची 23 मीटर असून एकुण लिफ्टची 20 प्रवाशी क्षमता असेल.

या प्रकल्पाची वाहतूक क्षमता एकावेळेस 80 प्रवासी चढणे व उतरण्याची असेल.

या प्रकल्पामध्ये एकुण 32 दुकान गाळेप्रसाधन गृहसुरक्षा कर्मचारी कक्षउपहार गृह उपलब्ध असतील.

मंदिर प्रशासनासाठी स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय राहील. दर्शनीय लॉबीभविष्यातील गरजेनुसार ट्रॅव्हेलेटरचे प्रयोजनासह राहील.

सोलार सिस्टीम प्लांटभूमिगत पाणी टाकीची क्षमता लाख लिटरची असेल.

याचबरोबर घनकचरा निर्मुलन व्यवस्थाप्रतीक्षालयेवृद्ध व दिव्यांगासाठी स्वतंत्र दर्शन रांगसीसीटीव्ही कॅमेरा व्यवस्थाहिरकणी कक्ष व दोन स्वतंत्र कक्ष राहतील.

याचबरोबर इतर अनुषंगिक सुविधेचा यात समावेश करण्यात आला आहे.

श्री रेणुका देवी मंदिर माहूरगडसाठी लिफ्टसह स्काय वॉकचे बांधकाम करण्यास केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून एकुण 51.03 कोटी रुपयास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. स्थापत्य व विद्युतसाठी 50.60 कोटी रुपयास तांत्रिक मान्यता दिली आहे. या कामाचा कालावधी हा 18 महिने असून प्रकल्प हाताळणे व देखभालदुरूस्तीसाठी 10 वर्षाचा कालावधी राहील. कामाची अंदाजित किंमत ही 39 कोटी 91 लाख रुपये वस्तू व सेवाकर वगळून आहे. प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा मे. व्यापकॉस ली. गुरूग्राम आहे. मे. डी. सी. गुरूबक्षानी नागपूर यांना हे काम देण्यात आले आहे.

00000







No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...