Thursday, March 9, 2023

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून

स्तन कर्करोग जागरुकता व उपचार अभियानास सुरुवात


नांदेड (जिमाका) दि.
 9 :-  राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार महिला मधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे आज घडीला इतर कर्करोगा पेक्षा जास्त आहे. त्यामुळे महिलाच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान व उपचार होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीकोणातून राज्य शासनाने स्तन कर्करोग जागृती व उपचार अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे व त्याची सुरुवात 8 मार्च पासून महिला दिनाचे औचीत्य साधून केली आहे.

 

या अभियानाची सुरुवात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात केली. यावेळेस वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी,
आयुक्त डॉ. राजीव निवतकर
 संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर व डॉ. अजय चंदनवाले, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण यांची उपस्थिती होती.

 

8 मार्च पासून हे अभियान संपूर्ण महाराष्ट्र भर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा भाग म्हणून नांदेड येथील व परिसरातील महिलांच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी व कर्करोगाचे लवकर निदान व उपचार करून महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी 8 मार्च रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शा. वै. म, नांदेड येथे बाह्य रुग्ण विभाग १२३ मध्ये  BREAST CLINIC ROOM  स्तन कर्करोग तपासणी कक्ष असा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष दर बुधवारी १२ ते २ दुपारी या वेळेत चालू असून त्यामध्ये स्तन कर्करोग तज्ञ महिलांची तपासणी करतील. तसेच योग्य त्या तपासण्या व उपचार मोफत करण्यात येतील.

 

या स्तन कर्करोग कक्षाचे उद्घाटन 8 मार्च रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शा. वै. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी .टी . जमदाडे यांचे हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील व परिसरातील महिलांनी या उपलब्ध सुविधेचा फायदा घेऊन स्तनाच्या कर्करोगावर मात करण्याचे आवाहन यावेळी अधिष्ठाता डॉ. पी.टी. जमदाडे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. वाकोडे, डॉ बोडके, वैद्यकीय अधीक्षक व शल्य चिकीत्सा शास्त्र विभागातील डॉ. अनिल देगावकर, डॉ. विद्याधर केळकर, डॉ. सुनील बोंबले , डॉ. बुशरा व इतर तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.

0000



No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...