Friday, January 20, 2023

वृत्त क्रमांक 33

 राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षाआतील मुले-मुली) क्रीडा स्पर्धाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड संयुक्त विद्यमाने तसेच ऑल महाराष्ट्र वुश असोसिएशन व नांदेड जिल्हा वुशू असोसिएशन यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2022-23 चे आयोजन दिनांक 21 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि. 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वा. मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

 

या स्पर्धेकरता महाराष्ट्र राज्यातील 8 विभागातून जवळपास 350 ते 400 खेळाडू, पंच, सामनाधिकारी, निवड समिती सदस्य व स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. खेळाडू मुलांची निवास व्यवस्था गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास गुरुद्वारा परिसर नांदेड येथे तर खेळाडूंची भोजनाची व मुलींची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली आहे.

ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत बॅडमिंटन इनडोअर हॉलमध्ये होणार असून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जास्तीतजास्त खेळाडू, क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

 

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी कलीमओददीन फारुखी,  संजय गाडवे, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक संतोष कनकवार, राजेश जांभळे, सचिव, नांदेड जिल्हा वुशू असो. डॉ. प्रमोद वाघमारे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, उत्तम कांबळे, सुभाष धोंगडे, मोहन पवार, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ, ज्ञानेश्वर रोठे आदि परिश्रम घेत आहेत.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...