Wednesday, November 16, 2022

कौमी एकता सप्ताह साजरा करण्याचे आवाहन

 कौमी एकता सप्ताह साजरा करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- शासन परिपत्रकानुसार शनिवार  19 नोव्हेंबर ते  शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 या कालावधी जिल्ह्यात कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व निमशासकीय, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आदींसह विविध यंत्रणांनी दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

या सप्ताहात शनिवार 19  नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस, रविवार 20 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक  कल्याण दिवससोमवार 21 नोव्हेंबर भाषिक सुसंवाद दिवस, मंगळवार 22 नोव्हेंबर दुर्बल घटक दिवस, बुधवार 23 नोव्हेंबर सांस्कृतिक एकता दिवस, गुरुवार 24 नोव्हेंबर महिला दिन आणि शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 रोजी पर्यावरण जोपासना दिवस साजरा करण्यात येणार आहे.

 

हा सप्ताह साजरा करण्यासाठी संबंधितांनी अल्पसंख्याक विकास विभाग 7 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन परिपत्रकाचे अवलोकन करावे व आपल्या अधिनस्त यंत्रणांद्वारे सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सूचित करण्यात आले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...