Friday, October 21, 2022

 मोजणी कामाच्या जलद निपटाऱ्यासाठी

भूमि अभिलेख कार्यालयास 22 लॅपटॉप

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-   संचालक भूमि अभिलेख पुणे यांच्या पुढाकाराने जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयास 22 लॅपटॉप प्राप्त झाले आहेत. जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस.पी.सेठीया यांचे हस्ते प्राप्त 22 लॅपटॉपचे वितरण प्रातिनिधिक स्वरूपात नुकतेच करण्यात आले. जिल्ह्यातील नऊ अधिनस्त उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारीभूकरमापक व निमतानदार/परीरक्षण भूमापक यांना आता लॅपटॉप उपलब्ध झाल्याने कामाचा जलद गतीने निपटारा करता येणे शक्य झाले आहे.

 

ईटीएस व रोव्हर मशिनने केलेले मोजणी काम अचुक व जलद नोंदविला जाईल. कार्यालयात प्राप्त मोजणी प्रकरणात मोजणी करुन हद्दीखुणा देणेची कार्यवाही त्याच दिवशी करणे सोईचे होईल. याचबरोबर ड्रोनद्वारे गावठाण भुमापन केलेल्या गावांचे पुढील कामकाज करणे व इपीसीएसद्वारे नगर भुमापनकडील ऑनलाईन फेरफार घेणे याकामी याचा उपयोग होईल असे श्रीमती एस.पी.सेठीया यांनी सांगितले.

0000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...