Tuesday, September 27, 2022

 सेवा पंधरवडा निमित्त तृतीयपंथीयांना

मतदान ओळखपत्राचे वितरण

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- शासनामार्फत देण्यात येत असलेल्या सेवा नागरिकांपर्यंत कालमर्यादेत पोहोचविण्यासाठी 'सेवा पंधरवाडा' उपक्रम राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ निमित्त आज 32 तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच तृतीयपंथीय यांची नॅशनल पोर्टलवर नाव नोंदणी करण्यात आली.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड  आणि कमल फाउंडेशन नांदेड व राजाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वझरता. मुखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने तृतीयपंथीयाच्या सर्वतोपरी विकासासाठी सांगवी येथे गौरी बकस यांच्या निवासस्थानी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

 

यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. तेजस माळवदकर , समाज कल्याणचे श्री. दवणे , कमल फाउंडेशन नांदेड अध्यक्ष अमरदीप गोधने, वझर येथील राजा रामभाऊ उद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुनिता सदाशिव शिंदेतृतीयपंथांच्या गुरु गौरी बकास व  तृतीयपंथी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

0000 




No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...