Thursday, September 22, 2022

 संस्कृतीचे जतन होणे आवश्यक

- ॲड गंगाधर पटने   

·         राजा राममोहन रॉय यांच्या जयंती निमित्त रॅलीचे आयोजन

·         विविध शाळेतील 250 विद्यार्थ्यांचा उर्त्स्फूत सहभाग 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- आधुनिक तंत्रज्ञानामुळे नवीन पीढी वाचनापासून दूर जात आहे.वाचनाची सवय जोपासल्यास मनुष्यामध्ये  प्रगल्भता निर्माण होते. नव्या पिढीची मानसिकता ओळखून त्यांच्या सोईने ग्रंथालयातील ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचवा यामुळे वाचनसंस्कृती वाढण्यास मदत होईल असे मत जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अँड.गंगाधर पटने यांनी व्यक्त केले. 

उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने राजा राममोहन रॉय यांच्या 250 व्या जयंती निमित्त महिला सक्षमीकरण शालेय मुलांची जनजागृती रॅली या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. 

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विकास माने, शारदा एज्युकेशन सोसासटीचे अध्यक्ष रावसाहेब शेंदारकर,  पोलिस निरीक्षक भगवान कापकर, मुख्याध्यापक प्रमोद शिरपूरकर,  जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

पुढे बोलताना पटने म्हणाले की, वाचनाने माणूस मोठा होतो जेवढे वाचन कराल तेवढे ज्ञान वाढत जाईल.स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी वाचणाची सवय अंगी असणे गरजे आहे असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला उपस्थित रावसाहेब शेंदारकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

या रॅलीमध्ये या रॅलीमध्ये नांदेड शहरातील महात्मा फुले हायस्कुल, सावित्रीबाई फुले हायस्कुल, प्रतिभा निकेतन हायस्कुल, शिवाजी विद्यालय, केब्रिज विद्यालय, दत्तप्रभू प्राथमिक शाळा, या शाळेतील विद्यार्थी रॅलरीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महिला सबलीकरण : योगदान, सतीप्रथेस प्रतिबंध, मालमत्तेबाबत महिलांना समान अधिकार असणे, विधवांना पुनर्विवाहाचा हक्क मिळणे, महिलांसाठी शिक्षण, बहुपत्नी व बाल विवाहास प्रतिबंध मनाई करणे या विषयावर रॅली काढण्यात आली होती.रॅलीचा समारोप जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी केले.

000000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...