Thursday, July 7, 2022

 जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न


नांदेड (जिमाका) दि. 7 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबीरास अप्पर जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

यावेळी रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहतूक चिन्ह, हाताचे इशारे, हेल्मेट/सिटबेल्ट परिधान करणे याबाबत मार्गदर्शन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी नियमातील बदल, रात्रीच्या वेळी, पावसाळ्यात वाहन चालविणे याबाबत मार्गदर्शन केले.

सार्वजनिक वाहतुकीचा दैनंदिन व्यवहारात वापर करणे, कुटूंबियासाठी नियमांचे पालन करणे. तसेच सध्या वाहन संख्येमध्ये वाढ होत आहेत. नवीन रस्ते तयार होत आहेत. अपघात कमी करण्यासाठी सर्वानी कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसिलदार मकरंद दिवाकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी जाधव यांनी परिश्रम घेतले.
0000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...