Wednesday, May 4, 2022

जिल्ह्यात फिरते लोकअदालत

व कायदेविषयक शिबिराचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 4 :- समाजाच्या तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दिष्ट ठेवून मा. सर्वोच्य न्यायालय दिल्ली यांच्या ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन जिल्ह्यातील निवडक तालुक्यांच्या निवडक गावामध्ये मे ते 21 मे 2022 या कालावधीत करण्यात आले आहे. हे फिरते लोकअदालत यशस्वी करण्यासाठी गावातील लोकांनी सहकार्य करावे. तसेच या फिरत्या लोकअदालतचा लाभ घ्यावाअसे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत एल. आणेकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आर.एस.रोटे यांनी केले आहे.

 

नुकतेच जिल्हा व सत्र न्यायालयात प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत एल. आणेकर यांच्या हस्ते फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीराचे मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथून या लोक अदालतीसाठी आलेल्या मोबाईल व्हॉनचे उदघाटन करण्यात आले. मे ते 21 मे 2022 या कालावधीत हे फिरते लोक अदालत नांदेड जिल्हातील निवडक तालुक्यातील नियोजीत गावात फिरुन न्यायालयात प्रलंबीत असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच बॅकांचेविमा कंपनीचे विद्युत महामंडळाचेबीएसएनल व इतर दिवाणी दाखलपुर्व प्रकरणे या लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करणार आहे. या कायदेविषयक शिबीराद्वारे जनजागृती केली जाणार आहे. या लोकअदालतीचे पॅनल प्रमुख म्हणुन सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सौ. कमल वडगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...