Tuesday, February 15, 2022

 कंत्राटी पदांसाठी माजी सैनिकांची निवड चाचणी 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-औरंगाबाद स्मार्ट सिटी बस जड वाहन वाहतूक परवानाधारक अनुभवी 100 माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर-कंडक्टरची प्राथमिक निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड प्रक्रिया 15 ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नंदनवन कॉलनी औरंगाबाद येथे राबवली जाणार आहे. यासाठी पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह (डिस्चार्ज बुकची प्रतआर्मी व सिव्हिल हेव्ही वेहिकल ड्रायव्हिंग लायसन्स आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट इत्यादी) आपली नाव नोंदणी  करुन घ्यावी. नांदेड, हिंगोली, जालनाबीड, बुलढाणा, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील इच्छूक माजी सैनिकांनाही प्रावधान देण्यात येणार आहे.

 

निवड चाचणीसाठी पात्रता :- सैन्य दलातील ट्रेड DSV (Spl Veh)/ AM-50/ Dvr/ Dvr (MT)/ DMT/ Dvr GNR/ Dvr (AFT) यापैकी असावा. दहावी / बारावी उत्तीर्ण आणि आर्मी ग्रॅजुएट शैक्षणिक आर्हता आवश्यक आहे. वैध प्रवासी बस वाहतूक परवाना (PSVBUS (TRV-PSV-Bus) धारकास प्राधान्य. निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच (बिल्ला) निवडीच्या/ नियुक्तिच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत तयार करावा. सैन्यदलात हेव्ही वेहिकल ड्रायव्हिंगचा किमान 15 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मेडिकल कॅटेगरी SHAPE-I. वयोमर्यादा 48 वर्षे आहे. माजी सैनिकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनीऔरंगाबाद दुरध्वनी 0240-2370313 या पत्यावर / दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. निवड प्रक्रियेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा प्रत्यक्ष सहभागी नाही, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...